बारामती | बारामती दूध संघाच्या संचालिका पदी मोरगावच्या अमृता गारडे यांची बिनविरोध निवड.

                      पुरंदर रिपोर्टर Live 

बारामती | प्रतिनिधी:सुनील निंबाळकर

                    बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, बारामती या संस्थेच्या संचालिका पदी अमृता योगेश गारडे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अमृता गारडे यांनी यापूर्वी बारामती पंचायत समिती येथे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांची ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

त्यांच्या कुटुंबाचीही सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भक्कम पार्श्वभूमी आहे. त्यांच्या सासूबाई कै. श्रीमती रुक्मिणी पांडुरंग गारडे या देखील बारामती पंचायत समितीच्या सदस्य होत्या, तर त्यांचे सासरे पांडुरंग रामचंद्र गारडे यांनी तब्बल १३ वर्षे मोरगावचे सरपंच म्हणून कार्य केले आहे.

ही निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून विभागीय उपनिबंधक, सहकारी दूध उत्पादक संस्था विभाग, पुणे येथील राजकुमार पाटील यांनी कामकाज पाहिले.

              यावेळी दूध संघाचे चेअरमन संजय कोकरे, व्हॉइस चेअरमन दत्तात्रय वावगे, बारामती दूध संघाचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे संचालक संभाजी होळकर तसेच बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप बांदल आदी मान्यवर उपस्थित होते.

अमृता गारडे यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments